चोकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोकट
चोकट

चोकट

sakal_logo
By

शहराचा ''हेरिटेज सिटी'' म्हणून
विकास साधणार ; केसरकर
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा ''हेरिटेज सिटी'' म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खासदार, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

दसरा महोत्सवासाठी
२५ लाखांचा निधी
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचण्यासाठी हा महोत्सव भव्य सोहळा (ग्रँड इव्हेंट) म्हणून साजरा करण्यात येईल, यात राज्य शासन सहभागी होईल, असे सांगून यावर्षीच्या दसरा महोत्सवासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.