सूर्यवंशी यांचे मरणोत्तर नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यवंशी यांचे मरणोत्तर नेत्रदान
सूर्यवंशी यांचे मरणोत्तर नेत्रदान

सूर्यवंशी यांचे मरणोत्तर नेत्रदान

sakal_logo
By

53952
विष्णू सूर्यवंशी

सूर्यवंशी यांचे
मरणोत्तर नेत्रदान
गडहिंग्लज, ता. ३ : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील विष्णू आनंदा सूर्यवंशी यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. सलग तीन दिवस तीन व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान होण्याची घटना चळवळीत प्रथमच घडली आहे.
उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील आऊबाई कोरी यांचे गुरुवारी (ता.२९), तर बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील लक्ष्मीबाई केसरकर यांचे शुक्रवारी (ता.३०) मरणोत्तर नेत्रदान झाले होते. दरम्यान, शनिवारी (ता.१) रात्री साडेनऊच्या सुमारास विष्णू सूर्यवंशी यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने ऐनापूर येथे जाऊन नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया पार पाडली.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २१ व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे, तर चळवळीतील नेत्रदात्यांचा आकडा ८१ वर पोहोचला आहे.