नॅबचा वर्धापन दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅबचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नॅबचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नॅबचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

54072
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

‘नॅब’चा वर्धापन दिन उत्साहात
कोल्हापूर, ता. २ : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड (नॅब) जिल्हा शाखा कोल्हापूरचा ३३ वा वर्धापन दिन झाला. दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. ‘नॅब’कडील दृष्टीहीन कलाकारांनी स्वागत गीत गायिले. निरंजन वायचळ यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
हायजिन साहित्याचा वापर दृष्टीहीन महिलांना आरोग्य उत्तम राखता यावे, यासाठी वायचळ यांच्या हस्ते वाटप केले. जिल्ह्यातील दृष्टीहीन महिलांना वितरित १०० हायजिन किट इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडून उपलब्ध करुन दिले. ‘नॅब’तर्फे महाविद्यालयीन अंधांच्या पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तकांचे वाटप जयश्री पिसे यांच्या हस्ते केले.
संस्थाध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी स्वागत केले. डॉ. मीना डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव विजय रेळेकर यांनी आभार मानले. शिवानंद पिसे, प्रमिला वाली, सविता शिंदे, रजनी चिंदगे, अंध बांधव उपस्थित होते.