राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आजरा शहरात संचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आजरा शहरात संचलन
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आजरा शहरात संचलन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आजरा शहरात संचलन

sakal_logo
By

54284
आजरा : येथे झालेल्या संचलनात सहभागी झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
आजरा शहरात संचलन
आजरा, ता. ३ : शहरात दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी संचलन केले. व्यंकटराव हायस्कूलपासून संचलनाला सुरवात झाली. महाजन गल्लीत याची सांगता झाली. संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ, सोमवार पेठ, चर्च गल्ली, सुतार गल्ली, महाजनगल्ली असे संचलन झाले. महाजन गल्लीतील विद्यावर्धिनी सभागृहात कार्यक्रम झाला. जिल्हा संघ कार्यवाह भास्कर कामत अध्यक्षस्थानी होते. अनिल मोंडकर (मालवण) व तालुका सहकार्यवाह वामन आपटे प्रमुख उपस्थित होते. मोंडकर यांनी भाषणात आणीबाणीच्या काळातील आजऱ्यातील वास्तव्यास असतानाच्या आठवणी जागवल्या. संघ स्वयंसेवक कसा असावा, राष्ट्रनिष्ठा कशी असावी, याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी श्रीपाद कुलकर्णी, मंदार बापट, बाबू दळवी, विनायक चिटणीस, शिवाजी येसणे, विजय राजोपाध्ये, श्रीपती यादव, सुधीर चोडणकर, रमेश हुक्केरी यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.