जिल्हा विधी सेवा प्राधिकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

sakal_logo
By

राष्ट्रीय लोक अदालतीचे
१२ नोव्हेंबरला आयोजन

कोल्हापूर, ता. ३ ः राष्ट्रीय लोक अदालत १२ नोव्हेंबर होणार आहे. तंटे तडजोडीने मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक, सहकार, कौटुंबिक, कामगार न्यायालय, शाळा न्यायाधीकरण येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, कळे, खेरीवडे, मलकापूर, पन्हाळा, कागल, कुरुंदवाड, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, पेठवडगाव, राधानगरी या तालुका न्यायालयातही या अदालतीचे कामकाज चालणार आहे. न्याय आपल्या दारी, या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हॅनद्वारे विधी साक्षरता मोहीम १० ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे. शहरासह तालुका पातळीवरही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ट्रॅफिक चलनसह तडजोडीने मिटू शकणारे तंटेही मिटविण्यात येणार असल्याचे सचिव पाटील यांनी सांगितले.
-----------