रवळनाथ, ज्ञानदीपतर्फे स्वच्छता मोहिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथ, ज्ञानदीपतर्फे स्वच्छता मोहिम
रवळनाथ, ज्ञानदीपतर्फे स्वच्छता मोहिम

रवळनाथ, ज्ञानदीपतर्फे स्वच्छता मोहिम

sakal_logo
By

54292
काळभैरी डोंगर : रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी व ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे काळभैरव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

‘रवळनाथ’, ‘ज्ञानदीप’तर्फे स्वच्छता मोहीम
गडहिंग्लज : येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी व ज्ञानदीप प्रबोधिनीच्या झेप ॲकॅडमी व इंटेट करिअर ॲकॅडमीतर्फे काळभैरव मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘स्वच्छ भारत-सुंदर भारत’ या संकल्पनेतून श्री काळभैरव मंदिर, डोंगर परिसरात स्वच्छता मोहिमेत संस्थापक-अध्यक्ष चौगुले, संचालक डॉ. पाटील, महेश मजती, डॉ. संजय चौगुले, संदीप कागवाडे, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. संस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यंच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्रा. विजयकुमार घुगरे यांची उपस्थिती होती. सायली बुगडे, सानिका करंबळकर, विद्या देसाई, डॉ. दत्ता पाटील, चौगुले यांची भाषणे झाली. प्रा. मनोहर गुरबे यांनी स्वागत केले. प्राचार्य एस. एन. देसाई यांनी आभार मानले. या वेळी डॉ. आर. एस. निळपणकर, मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, डॉ. समिधा चौगुले उपस्थित होत्या.