प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड
प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड

प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड

sakal_logo
By

५४३४६

सदर बाजारातील आरोग्य केंद्राची तोडफोड

अज्ञात जमावाचे कृत्य; लसीकरणानंतर बालक दगावल्याचा आरोप, परिसरात तणाव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : लसीकरणानंतर बालक दगावल्याचा आरोप करत अज्ञातांनी सदर बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आज दुपारी तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सदर बाजार येथे आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र (क्र. ९) आहे. या केंद्रात शुक्रवारी बालकांचे लसीकरण करण्यात आले होते. यामध्ये एका दीड महिन्याच्या बालकालाही लस देण्यात आली होती. मात्र, हे बालक दुसऱ्याच दिवशी दगावले. दरम्यान, आज दुपारी अज्ञात जमाव या आरोग्य केंद्रात शिरला. त्या जमावाने संबंधितांना याबाबतचा जाब विचारला. त्यानंतर येथील खिडक्यांसह टेबलावरील काचांची तोडफोड केली. टेबलावरील संगणकासह इतर साहित्यही विस्कटले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला. याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक राजेश गवळी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी जमाव तेथून निघून गेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
...........

कोट
सदर बाजार येथील आरोग्य केंद्रातून त्या मुलाबरोबर इतरांनाही डोस दिले. इतरांना त्रास झालेला नाही; पण लसची बाटली तपासणीसाठी घेतली आहे. चौकशीनंतर चित्र स्पष्ट होईल.
- रविकांत आडसूळ, उपायुक्त