सर्कीट बेंच आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्कीट बेंच आंदोलन स्थगित
सर्कीट बेंच आंदोलन स्थगित

सर्कीट बेंच आंदोलन स्थगित

sakal_logo
By

सर्किट बेंचबाबतचे
शुक्रवारचे आंदोलन स्थगित
कोल्हापूर, ता. ३ ः मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. ७) करण्यात येणारे आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके आणि सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली.
सर्किट बेंचच्या प्रश्‍नाकडे शासन आणि न्यायव्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी आंदोलन करण्याचा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या उपस्थितीत खंडपीठ कृती समितीने घेतला होता. यात शुक्रवारी सहा जिल्ह्यांतील तालुका व जिल्हा बार असोसिएशन यांनी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची भेट घ्यावी आणि सर्किट बेंच प्रश्‍न निकाली लावावा, असे निवेदन देण्याचा ठराव केला होता. दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची सर्वोच्य न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती संदर्भात शिफारस झाली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक होत नाही. तोपर्यंत सर्किट बेंचसंदर्भात आंदोलन अगर निवेदन देणे उचित होणार नसल्याने हे आंदोलन स्थगित केल्याचे म्हटले आहे.
---------