पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

गडहिंग्लजच्या स्वच्छतेला सुवर्ण झळाळी
राज्यासह वेस्ट झोनमध्ये सहावा : पालिकेला प्रेरक दौर सम्मान अभियानात सुवर्णपदक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गडहिंग्लज शहराने राज्यात सहावा आणि देशपातळीवरील वेस्ट झोनमध्ये सहावा क्रमांक पटकावला. घनकचरा, ओला-सुका कचऱ्यावरील प्रक्रिया, मैला व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय स्वच्छता आदी घटकांत उत्कृष्ट काम झाल्याने या अभियानातील प्रेरक दौरा सम्मान अभियानातून पालिकेला सुवर्णपदकही मिळाले आहे.
गडहिंग्लज पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून कंपोष्ट खत निर्मिती केली जाते. त्याला राज्य शासनाकडून ब्रॅण्डही मिळाला आहे. याशिवाय मैला व्यवस्थापन केले जाते. यावर प्रक्रिया करून पाण्याचा वापर झाडांना दिले जाते. पालिकेकडून प्रबोधन होत असल्याने बहुतांशी नागरिक घरातील कचऱ्यापासून खतनिर्मिती करतात. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. शहरातील चौकांचे सुशोभीकरण केले आहे. रोजची झाडलोट होत असल्याने शहर स्वच्छता चांगली राहते. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छताही रोजच्या रोज केली जाते. २०२२ मध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन केंद्र शासनाच्या तपासणी पथकाने मूल्यमापन केले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात गडहिंग्लज नगरपरिषदेचा वेस्ट झोनमध्ये सहावा क्रमांक आला. राज्यपातळीवरील स्पर्धेतही सहावा क्रमांक पटकावून पालिकेने यशाचा झेंडा फडकवला. यावर्षीपासून स्वच्छ सर्वेक्षणात प्रेरक दौरा सम्मान अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत स्वच्छतेतील सहा घटकांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पालिकांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येते. त्यातून गडहिंग्लज पालिकेनेही सुवर्णपदक पटकावले आहे.

कोट
स्वच्छता मोहिमेमध्ये गडहिंग्लज शहराला घनकचरा व्यवस्थापनात थ्री स्टार व हागणदारीमुक्त शहर म्हणून गडहिंग्लजला ओडीएफ प्लस-प्लसचा दर्जा मिळाला आहे. या सर्व अभियानातील यशामुळे पालिकेला पाच कोटींहून अधिक रकमेचे बक्षिस मिळणार आहे. या यशात नागरिकांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगारांचे सहकार्य मोलाचे ठरले.
- स्वरूप खारगे, मुख्याधिकारी