आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन देणार प्रस्‍ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन देणार प्रस्‍ताव
आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन देणार प्रस्‍ताव

आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन देणार प्रस्‍ताव

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

शाळा, दवाखाने
दुरुस्‍तीसाठी प्रस्‍ताव
आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन विभागाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ३ : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत निधी मागणीचे प्रस्‍ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्‍हा परिषदेचा आरोग्य, पशुसंवर्धन व प्राथमिक शिक्षण विभागाकडून दुरुस्‍तीचे प्रस्‍ताव तयार करण्यात येत आहेत. मोडकळीस आलेल्या शाळांची यादी यापूर्वीच शिक्षण विभागाने केली आहे. यात पुन्‍हा नव्याने काही शाळांची भर पडणार आहे. आरोग्य विभागांतर्गत असलेले दवाखाने व तेथील ऑपरेशन थिएटर, स्‍वच्‍छतागृहेही दुरुस्‍त केली जाणार आहेत. दोन दिवसांत हे सर्व प्रस्‍ताव जिल्‍हा नियोजन मंडळाकडे सादर करण्यात येणार आहेत.
राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीने घेतलेले सर्व निर्णय स्‍थगित केले होते. यात निधी वितरण थांबवण्याचेही आदेश होते. त्यामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्‍प झाले होते. याबाबत टीका होऊ लागल्यानंतर पालकमंत्र्यांची नेमणूक केली व त्यापाठोपाठ निधी वितरणाबाबतही सूचना दिल्या. त्यानुसार जिल्‍ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी जिल्‍हा नियोजन मंडळाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत प्राथमिक माहिती घेतली. गतवर्षी कोणत्या विभागाला व कोणत्या कामासाठी निधी मिळाला, याची माहिती त्यांनी घेत अधिकाऱ्यांना काही सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
पालकमंत्र्यांच्या सूचना प्राप्‍त झाल्यानंतर जिल्‍हा परिषदेने आरोग्य, शिक्षण व पशुसंवर्धन विभागाकडील दुरुस्‍तीचे प्रस्‍ताव तयार केले आहेत. आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या, दुरुस्‍तीची गरज असलेल्या दवाखान्यांची यादी तयार केली आहेत. चांगली पटसंख्या व दुरुस्‍तीची गरज असतानाही निधी न मिळालेल्या शाळांची माहिती संकलित करण्यात येत आहे.