स पटा पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स पटा पान ५
स पटा पान ५

स पटा पान ५

sakal_logo
By

54345
सा. रे. पाटील स्मृती मराठी कथा
स्पर्धेचा निकाल जाहीर
शिरोळ : स्व. आ. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. यात प्रथम क्रमांक चंद्रकांत घाटाळ
(डहाणू-पालघर) यांच्या ‘बीन आडनावाची पोरी’ व प्रा. श्रीराम काळे (वारजे, पुणे) यांच्या ‘सलाईन थेरपी’ या कथेला प्रथम क्रमांक मिळाला.
कथा स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्तान, आंध्रप्रदेश, दिल्ली येथून १०९ लेखकांच्या कथा स्पर्धेसाठी आल्या होत्या.
व्दितीय क्रमांक शर्मिला कारखानीस (नवी दिल्ली) यांची ‘पेईंग इट फॉरवर्ड'' आणि महेश कोष्टी (मिरज )यांची ‘चक्कार'' या कथांना विभागून दिला आहे.
तृतीय क्रमांक चिंतामणी मुळे (डेंबिवली-ठाणे) यांची ‘अनामिक'' व भारत सोनावणे (कन्नड, औरंगाबाद) यांची ‘सिमांतिनी’ या कथांना विभागून दिला आहे.
याशिवाय ‘आलावा‘ (डॉ. संजीव कुलकर्णी, नांदणी), ‘चांदकी’ (किरण पाटील, बटकणंगले) व ‘वाघाटीचा बांध’ (सविता माने, आंध्र प्रदेश, मूळ माहुली, विटा ) या तीन कथांची उत्तेजनार्थ निवड केली, अशी माहिती मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. मोहन पाटील व साहित्य सहयोग दीपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी दिली.

03161
डॉ. कमळकर.

डॉ. कमळकर यांच्या पुस्तकाला पुरस्कार
मुरगूड : कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या''शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा'' या पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर मळगे बुद्रुक (ता. कागल) येथील आहेत. त्यांनी विविध तालुक्यात गरशिक्षणाधिकारी पदावर काम करत असताना विद्यार्थी व शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. यासाठी त्यांना न्युपाचा २०१५ चा नॅशनल इनोव्हेशन अॅवॉर्ड मिळाला आहे. अशा नावीन्य पूर्ण उपक्रमांची माहिती त्यानी शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा या पुस्तकात दिली आहे. त्यासाठी संकल्प फौंडेशन तिरपण महागाव (ता. गडहिंग्लज) यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. महागाव येथे एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.