राजाराम कारखाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम कारखाना
राजाराम कारखाना

राजाराम कारखाना

sakal_logo
By

54381

‘राजाराम’मध्ये यावर्षी
सव्वा पाच लाख टन गाळप

पाटील ः कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन

कसबा बावडा, ता. ३ ः येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात यावर्षी सव्वापाच लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे संचालक पंडित यशवंत पाटील व त्यांच्या पत्नी सौ. हिराबाई यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, ‘कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व काटकसरीच्या धोरणामुळे व माजी आमदार अमल महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना चांगल्या पद्धतीने प्रगती करीत असून, गाळप क्षमता १८.५ मे. वॅट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणीसह प्रतिदिन पाच हजार टन गाळप क्षमता करणार आहे. यामुळे सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे वेळेत गळीत करणे शक्य होईल. कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा आणि अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ऊस पुरठवदार शेतकऱ्यांनी नोंदवलेला सर्व ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे.’
सचिव उदय मोरे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष वसंत बेनाडे यांनी आभार मानले.