माता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माता अभियान
माता अभियान

माता अभियान

sakal_logo
By

एक हजार महिलांची आरोग्य तपासणी
कोल्हापूर, ता.३ : माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात महापालिकेने शहरातील १८ वर्षांवरील एक हजार महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी केली.
सोमवारी एक हजार महिलांपैकी १८ वर्षावरील ३६८ महिलांची आरोग्य तपासणी केली. त्यात उच्चरक्तदाबाच्या ६, रक्तक्षयाच्या ५, मधुमेहाच्या ३ महिलांची तपासणी केली. गर्भधारणापूर्व ८ महिलांची नोंदणी करून तपासणी केली. १४३ गरोदर मातांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात उच्च रक्तदाबाच्या २ तर ३० गरोदर मातांचे कोविड लसीकरण केले. ३० वर्षावरील २११ महिलांची तपासणी केली असून, त्यात ४ महिलांना उच्च रक्तदाब, २ महिलांना मधुमेह आढळला.