मक्तेदारांचे काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मक्तेदारांचे काम बंद आंदोलन
मक्तेदारांचे काम बंद आंदोलन

मक्तेदारांचे काम बंद आंदोलन

sakal_logo
By

महापालिका फोटो
-----------
मक्तेदारांचे काम बंद आंदोलन
मनपा पाणीपुरवठा विभाग; थकीत बिलांची मागणी
इचलकरंजी, ता. ३ ः थकीत बिलांच्या मागणीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मक्तेदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या विभागाकडील देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची भीती आहे. याबाबत सायंकाळी महापालिकेत झालेल्या बैठकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रशासनाकडून बिले देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मक्तेदारांनी काम बंद आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वार्षिक देखभाल दुरस्तीची कामे करणारे सुमारे २५ हून अधिक मक्तेदार आहेत. गळती काढणे, कूपनलिका दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे यासारखी कामे वार्षिक निविदा पद्धतीने करण्यात येतात. ही कामे महापालिका फंडातून केली जातात. मक्तेदारांची २०१८ पासून बिले थकली आहेत. सुमारे दोन ते अडीच कोटींच्या घरात ही बिले आहेत. वेळेत बिले मिळत नसल्यामुले मक्तेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. कामगारांना पगार देणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
प्रशासक सुधाकर देशमुख यांनी गणेशोत्सवानंतर हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते; पण कोणत्याही हालचाली होत नसल्याचे पाहून त्यांनी काल आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज मक्तेदारांच्या शिष्टमंडळाने प्रशासक देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यामध्ये वार्षिक कामांची थकीत बिले सातत्याने मागणी केल्यानंतरही मिळत नसल्यामुळे आजपासून काम बंद आंदोलन करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर देशमुख यांनी सायंकाळी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा होती. याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याबाबत चर्चा केली; पण तातडीने बिले काढण्यास प्रशासनाकडून असमर्थता दर्शवली. त्यामुळे मक्तेदारांनी वार्षिक कामे बंद ठेवत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची भीती आहे. बैठकीत माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
--------------