वाहतूक नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियोजन
वाहतूक नियोजन

वाहतूक नियोजन

sakal_logo
By

सीमोल्लंघन सोहळ्यादिवशी
वाहतूक मार्गात बदल

कोल्हापूर, ता. ३ ः दसरा चौकात साजरा बुधवारी (ता. ५) साजरा होणाऱ्या शमीपूजन सीमोल्लंघन सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजनासाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे.

*मोटारीसाठी बंद केलेले मार्ग
* व्‍हिनस कॉर्नर ते सीपीआर चौक
*सीपीआर ते भवानी मंडप
*गंगावेस माळकर सिग्नल चौक जाणारा मार्ग गंगावेस येथे बंद करण्यात येणार आहे.
*कसबा बावडा ते सीपीआर चौक हा मार्ग महावीर कॉलेज येथे बंद
*रत्‍नागिरीकडून केर्ले मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे येणारी अवजड वाहतूक वडणगे फाटा येथे बंद करण्यात येणार आहे.
-------------
वळविलेले मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडून येणारी सर्व मोटार वाहने सीपीआर सिग्नल चौक, जुने ट्रॅफिक ऑफिस, खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालय चौक मार्गे सोयीनुसार पुढे सोडण्यात येणार आहे. बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर मार्गे येणारी सर्व मोटार वाहने स्वयंभू गणेश मंदिर, कोंडा ओळ सिग्नल, व्हिनस कॉर्नर चौक मार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत. स्टेशनरोडवरून येणारी वाहने फोर्ड कॉर्नर चौकातून पुढे सोडली जातील.
-------------------
पार्किंग व्यवस्था
*करवीर पंचायत समिती कार्यालय समोरील मोकळी जागा
*लक्ष्मी जिमखाना शहाजी कॉलेजजवळ
*शहाजी कॉलेज
*चित्रदुर्ग मठ
*व्‍हिनस गाडी अड्डा पार्किंग
*१०० फुटी रोड