लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेख
लेख

लेख

sakal_logo
By

07404
-----------
वारणानगर येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, केडीसीसी बँकेचे संचालक, पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार, माजी मंत्री, डॉ. विनय कोरे यांचा आज ५१ वा वाढदिवस त्यानिमित्त....
07407
-मोहन येडूरकर,
कार्यकारी संचालक, वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ
-----------
दृढनिश्चयी नेता ः डॉ. विनय कोरे
आज आपल्या सावकरांचा वाढदिवस! वारणा परिसर आजचा दिवस दिवाळीसारखा साजरा करतो. मी त्यांच्या सहवासात सुमारे २५ वर्षे आहे. सावकर अर्थात आमदार डॉ. विनय कोरे यांच्या झालेल्या बदलाचा मी एक दूरस्थ साक्षीदार आहे. तात्यासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन ‘वारणा’ गिळंकृत करायला निघालेल्या वेळचे बंडखोर, बेदरकार आणि या मतलबी व्यक्तीविरुद्ध पेटून उठलेले आणि त्याचवेळी समवयस्क तरुणांचा गट निर्माण केलेले, तात्यासाहेबांच्या आणि विलासराव दादांच्या निधनानंतर सहकारी संस्थांच्या उभारणीत लक्ष घातलेले आणि त्याचवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले, आमदार झालेले, मंत्री झालेले, निवडणुकीत पराभव झालेले, ज्यांच्यावर मनापासून विश्वास टाकला अशा अधिकाऱ्यांनी ‘वारणा’ची वाताहत केलेली पाहून हताश झालेले, यानंतर या फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन निवडणुकीत विजयी झालेले, दरम्यानच्या काळात ‘वारणे’तील संस्थांत लक्ष घालून त्यांना शिस्त लावणारे सावकर. अशी असंख्य अगणित रूपे डोळ्यांसमोर तरळतात. आता आपल्यासमोर आहेत, ते डोक्यावर विरळ केस असलेले, दाढी, मिश्या रुपेरी झालेले, अत्यंत नियंत्रणपूर्वक वजन कमी केलेले, उत्साही, परिपक्व, धोरणी, उमदे आणि आपल्यातले नेतृत्व गुण वापरून समाजहिताची असंख्य कामे करणारे, जबाबदारी घेणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाप्रत जाणारे सावकर. तरुणात प्रिय, मध्यमवयीन समाजात प्रिय आणि वृद्धात अतिप्रिय असणारे सावकर.
‘वारणा’ आपली जीवनदायिनी आहे. वारणेतील सर्व संस्था मायमाऊली आहेत. त्या सर्वांचा प्राण, ऊर्जा, उत्साह व नियंत्रण ते आहेत. त्यांचा हा धूमधडाका अखंड चालू राहावा, त्यातून लक्षावधी लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी, हीच माझ्यासारख्या सामान्य वारणावासीयांची अपेक्षा.
|| तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची-पर्वा बी कुणाची ||
सावकरांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !