उत्तूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तूर
उत्तूर

उत्तूर

sakal_logo
By

बहिरेवाडीत बैलाचा लम्पीने मृत्यू
उत्तूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील एका बैलाचा लम्पी रोगाने मृत्यू झाला. दुस-या बैलाची प्रकृती चिंताजनीक आहे. आठवडाभरापूर्वी दोन बैलांना लम्पीची लागण झाली होती. लम्पीची लागण झाल्यावर दोन्ही बैलांवर पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपचार केले. यापैकी एका बैलाला ताप जाणवत होता.
या बैलाचा मृत्यू झाला. गावात २१९ गायवर्गीय व ७१० म्हैसवर्गीय जनावरे आहेत. दक्षता म्हणून ग्रामपंचायत व शेतक-यांनी गोठा स्वच्छ करून औषध फवारणी केली आहे. सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.