डॉ. सुनिल लवटे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सुनिल लवटे सत्कार
डॉ. सुनिल लवटे सत्कार

डॉ. सुनिल लवटे सत्कार

sakal_logo
By

85584
डॉ. सुनीलकुमार लवटेंच्या
नागरी सत्काराची जय्यत तयारी

रविवारी कार्यक्रम; डॉ. सदानंद मोरे, डॉ. खडसे यांची उपस्थिती
..............
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापर, ता. ४ ः ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा नागरी सत्कार रविवारी (ता. ९) ला होत आहे. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता हा सत्कार होणार आहे. राज्य साहित्य, संस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध लेखक अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांची प्रमुख उपस्थिती आहे. शिवाजी विद्यापाठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राज्यातील, परराराज्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. जे. पी. माळी व सचिव विश्‍वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. लवटे यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे. दीर्घकाळ त्यांचीही सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्याच्या कार्याचा गौरव नागरी सत्काराने होत आहे. त्यानिमित्त मानपत्र, स्मृतिचिन्ह, महावस्त्र देऊन डॉ. लवटे व डॉ. रेखाताई यांचा सत्कार होणार आहे. यानिमित्ताने डॉ. लवटे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारे आठ ग्रंथ प्रकाशित होणार आहेत.

चित्र प्रदर्शन व पुस्तक प्रकाशन
नागरी सत्कार केशवराव भोसले नाट्यगृहात आत व बाहेर दोन्हीकडे आसन व्यवस्था केली आहे. या नागरी सत्कार निमित्ताने डॉ. लवटे यांच्या विविध भावमुद्रांची रेखाचित्रे दळवीज आर्टस्‌च्या विद्यार्थ्यांनी रेखाटली आहेत. त्याचे प्रदर्शनही होणार आहे. डॉ. लवटे यांच्या साहित्यावर आधारित शुक्रवारी (ता. ७) पुस्तकाचे प्रकाशन शाहू स्मारक भवनात सायंकाळी ५ वाजता होणार आहे, असेही डॉ. माळी यांनी सांगितले.