निवड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवड बातमी
निवड बातमी

निवड बातमी

sakal_logo
By

01870
अध्यक्षपदी गीतांजली वाईंगडे बिनविरोध
शिरोली दुमाला, ता. ४ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६च्या करवीर तालुका अध्यक्षपदी गीतांजली वाईंगडे यांची, तर सचिवपदी दत्तात्रय धनगर यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेचे पदाधिकारी असे ः काकासाहेब पाटील, गौतम कांबळे, अशोक मुसळे, राजेंद्र गाढवे, आर. डी. कुंभार, अजित राणे, एम. टी. मोरे आदींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. नूतन अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करवीरचे गटविकास अधिकारी व्ही. व्ही. यादव यांच्या हस्ते सहायक गटविकास अधिकारी आर. एस. जाधव, विस्तार अधिकारी संदेश भोईटे, शिवानंद कोचरी, विजय नलवडे यांच्या उपस्थितीत झाला. अभिजित चौगले, सम्राट रानगे, शिवाजी वाडकर, सचिन तारदाळे, नीलेश कुंभार, प्रवीण खराळकर, सुरेश शेंडगे, पूनम कांबळे, गायत्री जाखलेकर, दीपा यादव, तब्बसुम अत्तार, सारिका बंडगर आदीसह ग्रामसेवक युनियन डीएनई १३६चे सभासद उपस्थित होते.