निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

54590
नारायण देसाई
कोल्हापूर ः सानेगुरुजी वसाहत येथील राजर्षी शाहू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नारायण केशव देसाई (वय ९३) यांचे निधन झाले. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शिवराज देसाई व मनोज देसाई यांचे ते वडील होत. गुरुकुल प्ले स्कूलच्या संस्थापिका सुनीता व वर्षा देसाई यांचे ते सासरे होत. श्री. देसाई यांनी लहानपणी हट्टाने स्वतःसाठी तीन इंची गणेशमूर्तीची घरी प्रतिष्ठापना केली. तीच परंपरा त्यांनी आजपर्यंत जपली. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ६) आहे.

00656
शालिनी पाटील
प्रयाग चिखली ः येथील शालिनी यशवंत पाटील (वय ६९) यांचे निधन झाले. येथील भारतीय महसूल सेवेतील अधिकारी महेश पाटील आणि उत्तम पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) प्रयाग चिखली येथे आहे.

54616
मारुती पाटील
कळे : पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी मारुती सदाशिव पाटील (वय ४१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

54568
वसंतराव माने
कोल्हापूर ः फुलेवाडी येथील वसंतराव पांडुरंग माने (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्‍या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांचे ते चुलते तर अर्बन बँकेचे संचालक जयसिंगराव माने यांचे बंधू होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

10394
कृष्णात जाधव
कोल्हापूर : कसबा बावडा येथील कृष्णात जाधव (वय ६२) यांचे निधन झाले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य सुजित जाधव यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.


54563
लक्ष्मीबाई कडोले
इचलकरंजी ः भोज (ता. निपाणी) येथील लक्ष्मीबाई वसंतराव कडोले (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डीकेटीईचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

02541
पांडुरंग माने
कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील ज्येष्ठ वकील पांडुरंग यशवंत माने यांचे (वय ७२) निधन झाले. ते शंकर नागरी पतसंस्थेचे संचालक व माजी अध्यक्ष होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविर्सजन शुक्रवारी (ता. ७) आहे.

54544
मालती साठे
कोल्हापूर ः वेताळमाळ तालीम, शिवाजी पेठ येथील श्रीमती मालती यशवंत साठे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रसिद्ध जॉकी (कै.) यशवंत विष्णू साठे यांच्या पत्नी होत्या. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

फोटो : 54561
गणपती पाटील
कोल्हापूर : निटवडे (ता.‌ करवीर) येथील गणपती धोंडी पाटील (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 54565
रुक्मीणी साखरे
कोल्हापूर : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीमती रुक्मिणी शामराव साखरे (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोतोली पेपर एजंट ओंकार साखरे यांच्या त्या आजी होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. ७) आहे.

00070
वैभव मुरचिटे
रुई ः येथील वैभव बाळासाहेब मुरचिटे (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.

00980
शामराव पार्टे
कडगाव ः नितवडे (ता. भुदरगड) येथील प्रगतशील शेतकरी शामराव बाळू पार्टे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ऊस, केळीचे विक्रमी पीक घेत असत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ५) आहे.