अंगणवाडी दत्तक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी दत्तक
अंगणवाडी दत्तक

अंगणवाडी दत्तक

sakal_logo
By

अंगणवाडी फोटो

अंगणवाड्यांच्या खासगीकरणाचा घाट
--
शासनाचा ‘दत्तक’ देण्याचा निर्णय ः कार्पोरेट कंपन्यांसह व्यक्ती, कुटुंबांना प्राधान्य
..................
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ४ ः अंगणवाड्यांचे बळकटीकरण करण्याच्या नावाखाली राज्यातील अंगणवाड्या दत्तक देण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला. अशा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांसह अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, ट्र्स्ट, क्लबबरोबरच व्यक्ती, कुटुंब व समूहांना प्राधान्य दिले आहे. यातून सरकार जबाबदारी झटकत असून अंगणवाड्यांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केला आहे.
राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना शासनाकडून विविध प्रकाराच्या सहा सुविधा दिल्या जातात. त्यात पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण याचा समावेश आहे. यासाठी प्रत्येक अंगणवाडीत सेविका व मदतनीस यांची नियुक्ती केली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका पातळीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत.
या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी एप्रिल २०१७ मध्ये आदर्श अंगणवाडी योजना सुरू केली. आता या अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे. म्हणून अंगणवाडी केंद्र सक्षम होणे आवश्‍यक असल्याचे सांगत त्या दत्तक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंगणवाडी दत्तक घेणाऱ्या संस्थांकडून इमारत बांधकाम, रंगरंगोटी, दुरुस्ती, शौचालय, पिण्याचे पाणी, आहार शिजवण्यासाठीचे साहित्य अशा भौतिक तर शालेय शिक्षणासाठी खेळ साहित्य, खुर्ची, बेंच, रंगीत टीव्ही आदी शैक्षणिक साहित्य द्यावे लागणार आहे. याशिवाय वजन काटा, उंची मोजण्याचे साधन, कौशल्य विकास कार्यक्रम, आरोग्य तपासणी या सुविधाही द्याव्या लागणार आहेत. या सर्व सुविधा आतापर्यंत शासनाकडून पुरवल्या जात होत्या. अंगणवाडी दत्तक घेणाऱ्या संस्थांकडून या सुविधा चांगल्या पध्दतीने दिल्या जातील का ? याविषयी साशंकता आहे. त्यामुळेच या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.
..............
दृष्टिक्षेपात राज्यातील अंगणवाडी
*एकूण अंगणवाडी - ९७ हजार ४७५
*मिनी अंगणवाडी - १३ हजार ११
*जिल्ह्यातील अंगणवाड्या - सुमारे ४ हजार
*अंगणवाडी सेविका मानधन - ८५०० रुपये
*मदतनीस मानधन - ४५०० रुपये

कोट
हा निर्णय म्हणजे चांगल्या चाललेल्या अंगणवाड्यांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यातून सरकार आपली जबाबदारी झटकत असून या निर्णयाला आमचा विरोध आहे.
-सुवर्णा तळेकर, अध्यक्षा, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ
.............