पान ७ स टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७ स टा
पान ७ स टा

पान ७ स टा

sakal_logo
By

01686
कौलगे ः येथील संगीत भजन स्पर्धेतील विजेत्या सप्तसूर बेळगुंदी संघास बक्षीस देताना मान्यवर.

कौलगेतील भजन स्पर्धेत
बेळगुंदीचे सप्तसूर भजनी मंडळ प्रथम
नानीबाई चिखली ः बजरंग भजनी मंडळ, कौलगे (ता. कागल ) यांच्या वतीने झालेल्या संगीत भजन स्पर्धेत सप्तसूर भजनी मंडळ बेळगुंदी ( ता.गडहिंग्लज ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ग्रामपंचायतीच्या पटांगणासमोर पार पडलेल्या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‍घाटन नारायण पाटील यांनी केले. द्वितीय विठ्ठलपंथी भजनी मंडळ, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), तृतीय विठ्ठलपंथी भजनी मंडळ बस्तवडे (ता.कागल) तर चौथा रवळनाथ भजनी मंडळ किणी (ता.आजरा) यांनी अनुक्रमे मिळवला. यावेळी उत्कृष्ट तबलावादक म्हणून पट्टणकोडोली संघाचे अशोक शिंदे, उत्कृष्ट गायक सप्तसूर भजनी मंडळाची मुग्धा यांची निवड केली. पंच म्हणून संदीप वाडकर, संजय घस्ते, धैर्यशील चौगुले, सुनील डांगरे यांनी काम पाहिले. यावेळी गावातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.

वारणाचा आज बॉयलर अग्निप्रदीपन
वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.५) होणार आहे. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यस्थळावर बुधवारी सकाळी ११.४५ मिनिटे या मुहूर्तावर कारखान्याचे कामगार खंडू पाटील यांच्या हस्ते सपत्निक व वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी केले आहे.

सिद्धनेर्लीत ३४ जनावरे लम्पीने बाधित
सिद्धनेर्ली ःयेथे जनावरांत लम्पी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. ३४ जनावरे बाधित झाली असून एका गायीचा मृत्यू झाला आहे. त्यात एकोणतीस गायी व पाच बैलांचा समावेश आहे. येथील पवार व मेटील वस्ती या गावाच्या बाहेरील बाजूच्या वस्तीमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात जनावरांत प्रादुर्भाव झाला आहे. शिवाजी पवार या एकाच पशुपालकाच्या बारा जनावरांना लागण झाली आहे. ग्रामपंचायत व शासकीय पातळीवर या वस्तीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बाधित जनावरांना अलगीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.


राजे बँकेच्या प्रधान कार्यालय इमारतीचे आज उद्‍घाटन
कागल : येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रधान कार्यालय इमारतीचा उद्‍घाटन सोहळा बुधवार (ता.५ ) रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. येथील जयसिंगराव पार्क येथे बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केले आहे. कार्यक्रमास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

01688
मठगाव (ता.भुदरगड) ः येथील वनहद्दीत फुललेली कारवी. (छायाचित्र ःपी.एन.पाटील)
भुदरगडच्या डोंगर कपारीत फुलली कारवी
पिंपळगाव ः भुदरगड तालुक्यातील डोंगर कपारीत दुर्मिळ कारवी वनस्पती फुलली आहे. भुदरगड किल्ल्यापासून जवळच असलेल्या मोठे बारवे अरण्यक्षेत्रात कारवी फुलली आहे.
तीन वर्षांतून ही वनस्पती फुलोरा देते. या फुलांपासून मोठ्या प्रमाणात मधही मिळतो. तर कारवीचा वापर धनगर समाजातील लोक झोपडी करण्यासाठी करतात. सध्या भुदरगड तालुक्यातील मठगाव, भुदरगड, मोठे बारवे येथील वनहद्दीत कारवी फुलली आहे.


03900
माडेकरवाडी : (ता. भुदरगड) येथे पोषण आहार सप्ताह प्रसंगी विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी व पालक.

माडेकरवाडी शाळेत पोषण आहार सप्ताह
गारगोटी ः माडेकरवाडी (ता. भुदरगड) शाळेत पोषण आहार सप्ताह, ‘सही पोषण देश रोशन'' अंतर्गत पोषण आहार सप्ताह साजरा झाला. बालकाच्या विकासात पोषण आहाराचे महत्त्व सांगताना मोड आलेली कडधान्ये, आंबवून केलेले पदार्थ, फळे, प्रथिनयुक्त पदार्थ मुलांच्या शरीरात जाण्यासाठी रोज जेवण बनवताना काय बदल करावा? याची माहिती मुख्याध्यापक दिगंबर मालंडकर यांनी दिली. मुलांनी बनवून आणलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन मांडले. प्रदर्शनाचे उद्‍घाटन वंदना प्रकाश बाबर यांनी केले. मुलांना व माता पालकांना पोषक आहार दिला. आशा स्वयंसेविका शुभांगी माडेकर, अंगणवाडी सेविका सौ. राजिगरे, अर्चना कोकाटे, शितल बाबर, अश्विनी पसारे, संध्या कोकाटे, शितल कोकाटे, सुरेखा कोकाटे आदी उपस्थित होते.