‘आजरा’चे आज बॉयलर अग्नीप्रदीपन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आजरा’चे आज बॉयलर अग्नीप्रदीपन
‘आजरा’चे आज बॉयलर अग्नीप्रदीपन

‘आजरा’चे आज बॉयलर अग्नीप्रदीपन

sakal_logo
By

‘आजरा’चे आज बॉयलर अग्नीप्रदीपन
आजरा, ता. ४ ः गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम बुधवारी (ता. ५) होत आहे. प. प. धर्माचार्य भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी संस्थान मठ क. नुल (ता. गडहिंग्लज) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता कार्यक्रम होईल. धार्मिक विधी कारखान्याचे संचालक दशरथ आनंदा अमृते व त्यांच्या पत्नी दिपाली यांच्या हस्ते होईल. कारखान्याने यंदा साडेचार लाख टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे गळीताचा प्रारंभही लवकर होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व सभासद, शेतकरी, व्यापारी, कंत्राटदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले आहे.