फेस्टीवल स्ट्रीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेस्टीवल स्ट्रीट
फेस्टीवल स्ट्रीट

फेस्टीवल स्ट्रीट

sakal_logo
By

54584 पहिले २ फोटो वापरावेत

दसरा फेस्टिव्हल स्ट्रीटचा
शहरवासीयांनी लुटला आनंद

कोल्हापूर, ता. ४ ः नृत्य, गायन, चित्र, वादन अशा विविध कलाप्रकारांनी आलेली रंगत, झांज व लेझीम पथकांमुळे निर्माण झालेला उत्साह, पारंपरिक खेळांनी जाग्या केलेल्या लहानपणीच्या आठवणी आणि मर्दानी खेळांचा थरार अशा वातावरणात आज सायंकाळी शहरवासीयांनी शाही दसरा फेस्टिव्हल स्ट्रीटचा आनंद लुटला. यंदा प्रथमच आयोजित केलेल्या फेस्टिव्हल स्ट्रीटचे उद्‍घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हा प्रशासन व महापालिकेने महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोलपंपादरम्यानच्या रस्त्यावर फेस्टिव्हल स्ट्रीटचे आयोजन केले आहे. उद्‍घाटनास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर आदी उपस्थित होते. ग्रामीण व शहरातील ११० बचत गटांचे कोल्हापुरी चपलेपासून विविध कलावस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. तेथील खाद्यपदार्थांचा मालोजीराजे यांच्यासह अन्य मान्यवरांनी आस्वाद घेतला. उद्या (ता. ५) दुपारपर्यंत ते सुरू राहणार आहेत.
करवीर प्रशालेच्या मुलींच्या झांजपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध शाळांतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. विविध कलाविष्कारही त्यांनी सादर केले. भोंडल्याची गाणी, मेहंदी, चित्रकला, कॅलिग्राफी, रांगोळी, टॅटू, पारंपरिक खेळ, विविध वाद्यवादन, झिम्मा-फुगडी, मर्दानी खेळ या स्ट्रीटवर रंगले. सहाय्यक आयुक्त विनायक औधकर, नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक संजय मोहिते, अर्जुन माने, राजाराम गायकवाड आदी उपस्थित होते.