बच्चनवेडे मैफल- सकाळ माध्यम प्रायोजक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चनवेडे मैफल- सकाळ माध्यम प्रायोजक
बच्चनवेडे मैफल- सकाळ माध्यम प्रायोजक

बच्चनवेडे मैफल- सकाळ माध्यम प्रायोजक

sakal_logo
By

बच्चनवेडे ग्रुपतर्फे म्युझिकल नाईट, चित्रकला स्पर्धा
शनिवारी, रविवारी आयोजन; सकाळ माध्यम समूह माध्यम प्रायोजक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बच्चनवेडे ग्रुपतर्फे शनिवारी (ता. ८) बच्चन म्युझिकल नाईट आणि रविवारी (ता. ९) बच्चन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. सकाळ माध्यम समूह माध्यम प्रायोजक असल्याची माहिती बच्चनवेडे ग्रुपचे सुधर्म वाझे यांनी दिली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी रात्री नऊ वाजता ‘बच्चन म्युझिकल नाईट- अब तक बच्चन’ ही मैफल रंगणार आहे. प्रल्हाद व विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पुरुष गायक, पाच महिला गायकासह दहा वादकांचा मैफलीत समावेश असेल. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीतून बच्चन अभ्यासक जी. बी. देशमुख लिखित ‘अ....अमिताभचा’ या लेखांच्या संदर्भातून बच्चन यांची कारकीर्द निवेदक उलगडतील. कल्याणी देशपांडे-जोशी (पुणे), अजय राव (पुणे), सुधाकर शानबाग (पुणे), प्रल्हाद पाटील, अक्षता गोवेकर (गोवा), वैष्णवी गोरड, विणा गोरड, हर्षदा परीट, फैजूल पटेल यांचा स्वसराज असेल.
रविवारी (ता. ९) शाहूपुरीतील एम. एस. पटेल हायस्कूलमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत चित्रकला स्पर्धा होईल. इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांत स्पर्धा होईल.
स्पर्धकांनी महानायक अमिताभ बच्चन यांचे चित्र, तसेच पेन्सिल रंग आदी सोबत आणायचे आहे. दोन गटातील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. राजू नांद्रे, डॉ. हर्षला वेदक, सचिन लिंग्रस, राजू बोरगावे, प्रकाश मेहता, प्रा. किरण पाटील, सचिन मणियार, प्रसाद जमदग्नी, दीपक घारगे, शिल्पा पुसाळकर, कुंदन ओसवाल, लक्ष्मण कांबळे, सरिता सुतार, गौतम मिसाळ, शुभदा कुलकर्णी यांनी संयोजन केले आहे.