दसरा पालकमंत्री शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा पालकमंत्री शुभेच्छा
दसरा पालकमंत्री शुभेच्छा

दसरा पालकमंत्री शुभेच्छा

sakal_logo
By

कोल्हापूरचा शाही दसरा
जागतिक पातळीवर पोहोचवणार
पालकमंत्री केसरकर; पुढील वर्षीपासून एक कोटींचा निधी

मुंबई, ता. ४ ः कोल्हापूरच्या दसरा महोत्सव जगभरात पोहोचावा, या उद्देशाने यावर्षी शासकीय सहभागातून अधिक भव्य आयोजन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. यावर्षी या महोत्सवासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार व्यक्त केले. पुढील वर्षीपासून भव्य स्वरूपात हा उत्सव साजरा केला जाईल, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्टले आहे. कोल्हापूर संस्थानमार्फत छत्रपतींच्या परंपरा जपल्या जात आहेत. त्या यापुढेही जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून पुढील वर्षीपासून विविध माध्यमातून एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. कोल्हापूर ही आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.