कोवाड-शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-शिबीर
कोवाड-शिबीर

कोवाड-शिबीर

sakal_logo
By

kwd५३
54623
कोवाड ः आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व इतर.
----------
कुदनूरला आरोग्य शिबिर
कोवाड ः कुदनूर (ता. चंदगड) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमात तालुका भाजप व आजरा येथील माहेर हॉस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर झाले. ११० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. लक्ष्मण यादव यांनी प्रास्ताविक, डॉ. संदेश जाधव यांनी स्वागत केले. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सेवा पंधरवड्यात जनसेवेची कामे केल्याचे समाधान भरमू पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. प्रवीण केसरकर, डॉ. बी. एफ. गॉडद, डॉ. बी. बी. गॉडद, डॉ. राजेश पाटील, डॉ. संदेश जाधव यांनी सेवा दिली. भावकू गुरव, अशोक कदम, बाबू मुतकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरासाठी तुकाराम ओऊळकर, प्रकाश कसलकर, भीमा तरवाळ, रामचंद्र बामणे, विलास शेटजी, भरमू पाटील, तुकाराम मल्हारी यांनी सहकार्य केले. विनायक पाटील यांनी आभार मानले.