गड-पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-पुरस्कार वितरण
गड-पुरस्कार वितरण

गड-पुरस्कार वितरण

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad61.jpg
54638
गडहिंग्लज : ओंकार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे पन्नालाल सुराणा यांना पुरस्कार प्रदान करताना सुभाष धुमे. शेजारी राजन पेडणेकर, हसन देसाई, डॉ. सुरेश चव्हाण आदी.
----------------------------

पन्नालाल सुराणा यांना
पेडणेकर पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना ज. र. तथा दादा पेडणेकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुभाष धुमे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. रोख पाच हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
ओंकार शिक्षण प्रसारक मंडळातर्फे यंदापासूनच पुरस्कार देण्यास सुरवात करण्यात आली आहे. समाजवादी विचारांना प्रमाण मानून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर होते. सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष हसन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शर्मिला घाटगे यांनी स्वागत केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी मानपत्र वाचन केले. प्रा. किसनराव कुराडे, दत्तात्रय बरगे, डॉ. सुरेश चव्हाण, राधिका पेडणेकर, स्नेहलता देशपांडे, सुरेखा केसरकर, शारदा आजरी, सुरेश थरकार, एस. आर. कांबळे आदी उपस्थित होते. डॉ. संजिवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी आभार मानले.