यिन पोलिस मित्र समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन पोलिस मित्र समारोप
यिन पोलिस मित्र समारोप

यिन पोलिस मित्र समारोप

sakal_logo
By

लोगो -

फोटो - KPC22B10399


‘यिन’द्वारे तरुणाईकडून विधायक कामे

पोलिस अधीक्षक बलकवडे ः पोलिस मित्र सेवेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : तरुणाईकडून विधायक सामाजिक कामे करून घेणारे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी येथे केले.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित यिन पोलिस मित्र सेवेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नवरात्रोत्सवात यिनच्या विविध महाविद्यालयांतील सुमारे तीनशे सदस्यांनी ‘पोलिस मित्र’ म्हणून काम केले. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, मेन राजाराम हायस्कूल, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, भवानी मंडप येथे त्यांनी भाविकांना विविध सूचना देत गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पार पाडली.
बलकवडे म्हणाले, ‘महाविद्यालयीन तरुणाईचा समाजात परिवर्तन घडविण्यासाठी सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुणाला वेळीच चालना मिळाली, तर ते खूप चांगली कामे करू शकतात. त्याची प्रचिती त्यांनी पोलिस मित्र म्हणून केलेल्या कामातून दिली आहे. त्यांनी यापुढे विविध उपक्रमांत सहभाग घेऊन नेतृत्वविकास करावा.’
यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होत्या.
दरम्यान, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, राजलक्ष्मी कदम, पराग हिर्डेकर, तुषार रवंदे, सई साळोखे, साक्षी पाटील, शिवानी शिंदे, तानिया मुरसल, पोर्णिमा सूर्यवंशी, ओंकार रसाळ, मुग्धा कुलकर्णी, आदिती पवार, संकेत कोळी यांनी संयोजन केले.
---------------
चौकट
या महाविद्यालयातील यिन सदस्यांचा उपक्रमात सहभाग...
राजाराम, विवेकानंद, महावीर, न्यू, कॉमर्स, कमला, सायबर, सायबर महिला, स. ब. खाडे, गोपाळ कृष्ण गोखले, डी. वाय. पाटील टेक्निकल, वारणा, कर्मवीर हिरे, डी. डी. शिंदे सरकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी, भोगावती, विजयसिंह यादव महाविद्यालयांसह शिवाजी विद्यापीठातील हिंदी अधिविभाग
-------------------
चौकट
शाही दसरा सोहळ्यातही सेवा
कोल्हापूर संस्थानच्या शाही दसरा सोहळ्यातही विद्यार्थ्यांनी पोलिस मित्र म्हणून सेवा बजावली. ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानावर ते गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुपारी तीनपासून थांबून होते. तसेच करवीरनिवासिनी अंबाबाई, श्रीतुळजाभवानी देवी, गुरू महाराज यांच्या पालख्यांसमवेत काही विद्यार्थी होते.