बार असोसिएशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार असोसिएशन
बार असोसिएशन

बार असोसिएशन

sakal_logo
By

54745
कोल्हापूर ः जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांना निवेदन देताना कोल्हापूर शहर व जिल्हा सर्व पक्षीय टोलविरोधी कृती समितीचे बाबा पार्टे. शेजारी ॲड. महादेवराव आडगुळे आदी.
..............


बार असोसिएशनने
अपेक्षित सहकार्य करावे
टोलविरोधी कृती समितीची मागणी; एकाच तारखेला खटले चालविण्याची विनंती करा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः टोल आंदोलनातील खटल्यामध्ये जिल्हा बार असोसिएशनकडून अपेक्षित सहकार्य मिळावे. त्याचबरोबर एकाच तारखेला खटले चालविण्याची विनंती संबंधित यंत्रणेकडे करावी, अशी मागणी शहर व जिल्हा सर्व पक्षीय टोलविरोधी कृती समितीने केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांना दिले.
टोलविरोधी आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतचे खटले न्यायालयात सुरू आहेत. हे सर्व खटले एकाच तारखेला एकाच न्यायालयात चालविण्याची विनंती जिल्हा बार असोसिएशनने संबधित यंत्रणेकडे करावी. सर्व खटले विना मोबदला चालविण्याचे असोसिएशनने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यासाठी लागणारे अपेक्षित सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून केली. शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, बाबा महाडिक, दीपा पाटील, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.