इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद
इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद

इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद

sakal_logo
By

इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद
कृष्णा योजनेची नवीन जलवाहिनी मुख्य प्रवाहाला जोडणार
इचलकरंजी, ता. ६ ः शिरढोणनजिक कृष्णा योजनेची बदलण्यात आलेली नविन जलवाहिनी ही मुख्य जलवाहिनीला उद्यापासून (ता. ७) जोडण्यात येणार आहे. याबाबतचे काम तब्बल पाच दिवस चालणार आहे. या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐण सणासुदीत शहरात भीषण टंचाई जाणवण्याची भिती आहे.
शहराला कृष्णा योजनेतून प्राधान्याने पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेची जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. यातील काही किलो मिटरची जलवाहिनी यापूर्वी बदलली असून ती कार्यान्वीत केली आहे. शिरढोणजवळ आणखी दोन किलोमिटरची जलवाहिनी नविन टाकली आहे. पंचगंगा नदीपात्रातून बदललेल्या जलवाहिनीचाही यामध्ये समावेश आहे. परिसरातील जुनी जलवाहिनी खराब झाली असून तिला सातत्याने गळती लागत आहे. त्यामुळे बदललेली नविन जलवाहिनी मुख्य प्रवाह असलेल्या जलवाहिनीला जोडण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. उद्यापासून या कामाला प्रारंभ होणार आहे. किमान पाच दिवस या कामाला लागणार आहेत. या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी दिली.
सध्या दसरा संपला असून तोंडावर दिवाळी आली आहे. त्यामुळे ऐण सणासुदीच्या दिवसांत शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कृष्णा योजनेला तात्पुरता पर्याय म्हणून पंचगंगा योजना कार्यान्वीत आहे. पण त्यातून अत्यंत कमी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.