सराफ संघ रणरागिणी गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराफ संघ रणरागिणी गौरव
सराफ संघ रणरागिणी गौरव

सराफ संघ रणरागिणी गौरव

sakal_logo
By

54780
.....
नारीशक्तीचा सन्मान
सराफ संघाचा अभिमान
राजेश राठोड ः सराफ व्यावसायातील रणरागिणींचा गौरव
कोल्हापूर, ता. ६ ः नारीशक्तीचा केलेला सन्मान हा सराफ संघाचा अभिमान असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले. नवरात्रोत्सवानिमित्त संघातर्फे सराफ व्यावसायातील रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर ज्या महिला त्यांचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. अशा महिलांचा या वेळी गौरव झाला. त्यावेळी श्री. राठोड बोलत होते.
राठोड म्हणाले, ‘‘आमच्या माता-भगिनी घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर आपला पारंपरिक व्यवसाय न डगमगता, अडचणींवर मात करीत सक्षमपणे पुढे चालवत आहेत. त्या दृष्टीने संघातर्फे या रणरागिणींचा सत्कार करताना आम्हाला अभिमान आहे. येथून पुढेही त्यांना व्यवसाय करताना काही समस्या आल्यास संघ त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असेल.’’
‘चूल आणि मूल’ या पारंपरिक परिघातून महिला आज बाहेर पडून आपला व्यवसाय सांभाळत आहेत. त्याबद्दल त्यांचा समाजात गौरव होणे उचित असल्याचे मत माजी नगरसेविका माधुरी नकाते यांनी व्यक्त केले.
श्रीमती मंगल गुंदेशा, छाया हावळ, नूतनदेवी अग्रवाल, शोभा पोवार, अश्विनी भस्मे, ज्योत्स्ना बागल, भाग्यश्री शेळके, जयश्री शेळके, शकुंतला पेडणेकर यांचा सत्कार माधुरी नकाते, प्रेमलता परमार, अनिता राठोड, वर्षा हावळ आणि प्रभादेवी पाटील यांच्या हस्ते झाला.
सचिव तेजस धडाम यांनी स्वागत केले. या वेळी उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रितम ओसवाल, संचालक शिवाजी पाटील, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, अशोककुमार ओसवाल, किरण गांधी, विशाल हावळ, संपत पाटील, राजू बारस्कर, दिनकर लाळगे आदी उपस्थित होते.