माई ह्युंडाई रौप्यमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माई ह्युंडाई रौप्यमहोत्सव
माई ह्युंडाई रौप्यमहोत्सव

माई ह्युंडाई रौप्यमहोत्सव

sakal_logo
By

54781

माई ह्युंडाई शोरूम
रौप्यमहोत्सवी वर्षात
कोल्हापूर, ता. ६ ः माई ह्युंडाईने काल दसऱ्याच्या दिवशी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. वर्षभर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी वाहन उद्योगात ठराविक कंपन्यांच्या मोनॉपॉलीचे दिवस होते. ग्राहकांसाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असल्याने आफ्टर सेल्स सर्व्हिस आणि इतर सेवांना प्रचंड मागणीचे दिवस होते. याचवेळी कोरियन कंपनी ह्युंडाईचा भारतात प्रवेश झाला. अगदी सुरुवातीला भारतामध्ये ह्युंडाईने जे निवडक डिलर्स निवडले, त्यामध्ये कोल्हापुरातल्या घाटगे ग्रुपचे नाव आघाडीवर होते. त्याचे कारण घाटगे ग्रुपचे ट्रान्स्पोर्ट, कुरियर या व्यवसायातील काम, ग्रुपची विश्‍वासार्हता हे होते. ह्युंडाईची अधिकृत डिलरशिप म्हणून माई ह्युंडाईमधून ह्युंडाई कार्सची विक्री सुरू झाली. घाटगे ग्रुपमधल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या डिलरशिपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यासाठी जीवाचे रान करून वाहन उद्योगाच्या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. घाटगे ग्रुप आणि माई ह्युंडाईच्या कर्मचाऱ्यांची धडपड बघून ह्युंडाई मोटर्सने कोल्हापूरबरोबरच सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही माई ह्युंडईला डिलरशिप्स दिल्या. त्यामुळे गेल्या २४ वर्षांत साठ हजारांहून अधिक ग्राहकांनी विश्वासाने माई ह्युंडाईमधून ह्युंडाई कार्स खरेदी केल्या आणि विक्री पश्‍चात सेवेसाठी माई ह्युंडाईवरच विश्वास दाखवला. विक्रीपश्चात सेवा व ग्राहकांना समाधानकारक सेवेबद्दल माई ह्युंडईला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांत अनेक ठिकाणी महापूर, कोरोनासारख्या भयानक आपत्तीने अनेक उद्योग अडचणीत आले. ऑटोमोबाईल उद्योग पण याला अपवाद नव्हता. तरीही या कठीण काळातही ग्राहकांनी विश्‍वास दाखवला. कोरोना काळात वाढत्या पेशंट्सची संख्या लक्षात घेऊन मानवसेवा कोविड केअर सेंटरची स्थापना केली. त्याचा अनेक रुग्णांना लाभ मिळाला. यापुढेही माई ह्युंडाई ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून आपले अखंड सेवेचे व्रत चालूच ठेवेल, असा विश्‍वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.