राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलन

sakal_logo
By

54804

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
दसऱ्यानिमित्त संचलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे काल दसऱ्यानिमित्त शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून संचलन झाले. स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात संचलन केले. संचलनामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते.
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दरवर्षी संचलन करतात. यंदा नंगिवली तालीम, ताराराणी विद्यालय, आठ नंबर शाळा, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल या ठिकाणी शहरातल्या वेगवेगळ्या भागातील स्वयंसेवक एकत्र आले. येथून स्वयंसेवक संचलन करत पेटाळा मैदानावर एकत्रित जमले. या ठिकाणी प्रार्थना होऊन मुख्य संचलनाला प्रारंभ झाला. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, भुर्के दुकान, रंकाळावेस, साई मंदिर, तटाकडील तालीम, अर्ध शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी या मार्गाने संचलन निघाले. अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या संचलनाचे स्वागत नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी करून केले. संचलनामध्ये स्वयंसेवकांनी घोषणातील विविध वाद्यांवर भारतीय रचनांचे वादन केले. या घोष पथकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी संघाचे विभाग संघचालक प्रतापसिंह दड्डीकर, जिल्हा संघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, शहर संघचालक प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.