विभागीय युवक महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागीय युवक महोत्सव
विभागीय युवक महोत्सव

विभागीय युवक महोत्सव

sakal_logo
By

महावीर महाविद्यालयात आज
विभागीय युवक महोत्सव
कोल्हापूर, ता. ६ ः महावीर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातर्फे शुक्रवारी (ता. ७) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचा विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यात संगीत, नृत्य, वाङ्‌मयीन कला, रंगमंचीय कला व ललित कला या पाच कला प्रकारांतर्गत २७ प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील विविध अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उद्‍घाटन समारंभ श्री आचार्य विद्यानंद भवन येथे सकाळी ११.०० वाजता होणार आहे. श्री आचार्य देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एम. बी. गरगटे प्रमुख पाहुणे आहेत, तर विभागीय केंद्र कोल्हापूरचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. डॉ. आर. व्‍ही. कुलकर्णी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, असे प्राचार्य तथा केंद्रपमुख डॉ. आर. पी. लोखंडे, केंद्र संयोजक प्रा. जयवंत दळवी, केंद्र सहाय्यक बसवराज वस्त्रद, सांस्कृतिक प्रमुख प्रा. सौरभ पाटणकर यांनी कळवले आहे.