इचल ः अतिक्रमण सफाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः अतिक्रमण सफाया
इचल ः अतिक्रमण सफाया

इचल ः अतिक्रमण सफाया

sakal_logo
By

फोटो फाईल - ich68.jpg
54832
फोटो ओळ- इचलकरंजी ः शहरातील विविध ठिकाणी असलेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण गुरुवारी हटविण्यात आले. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)
..........

इचलकरंजीत अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम

धान्य ओळ, शॉपिंग सेंटर, थोरात चौक, वखार भाग झाला अतिक्रमणमुक्त

इचलकरंजी, ता.६ ः शहरात महापालिका झाल्यानंतर अतिक्रमणाच्या विरोधात आज धडक मोहीम राबविण्यात आली. कारवाईवेळी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले. या मोहिमेत धान्य ओळ, शॉपिंग सेंटर, थोरात चौक, वखार भाग आदी परिसर अतिक्रमणमुक्त केला. या कारवाईत पालिकेचे सुमारे शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, तर प्रशासक सुधाकर देशमुख स्वतः कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महात्मा गांधी पुतळा परिसरातून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईत हळदी-कूंकू विक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. धान्य ओळीच्या तोंडावर असलेल्या धान्य दुकानदारांच्या छपरीचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानंतर विरोध झाल्याने किरकोळ तणाव निर्माण झाला. नंतर दुकानदारांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. त्यानंतर या गल्लीतील दुकानदारांचे रस्त्यावर लावलेले बोर्ड जप्त करण्यात आले. शॉपिंग सेंटरमधील फळ विक्रेत्यांनाही हटविण्यात आले. मलाबादे चौक ते शाहू कॉर्नर परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करण्यात आले.
थोरात चौकात फूटपाथवर अनेक फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. आजच्या मोहिमेत पुन्हा या चौकातील फूटपाथ रिकामे करण्यात आले. वखार भागात जुन्या दुचाकी वाहन-खरेदी विक्रीची अनेक दुकाने आहेत. त्यांनी रस्त्यावरच वाहनांचा बाजार मांडला होता. आजच्या मोहिमेत त्यांचा हा बाजार उठविण्यात आला. यावेळी सात ते आठ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. या व्यावसायिकांनी नेहरुनगर हद्दीत पत्र्याचे शेड उभारले होते. या कारवाईत अशाप्रकारची चार शेड जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईवेळी महापालिकेच्या सुरक्षा गार्डसह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोहिमेत प्रभारी सहायक आयुक्त केतन गुजर, प्रभारी नगरसचिव विजय राजापुरे, शहर अभियंता संजय बागडे, आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार, नगररचनाकार रणजित कोरे, कार्यालय अधीक्षक प्रियांका बनसोडे, महिला बालकल्याण अधिकारी सीमा धुमाळ, सहायक लेखापाल किरण मगदूम, कर अधिकारी शीतल पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख एम. एस. चाबूकस्वार, सुभाष आवळे आदी सहभागी झाले होते.
----
मोहिमेत सातत्य ठेवणार ः प्रशासक देशमुख
यापुढे संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यासाठी सातत्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, असे महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी सांगितले. त्यांनी स्वतः आज या मोहिमेत सहभागी होत अतिक्रमण हटविण्यात आलेल्या परिसराची पाहणी केली.
-----