आमदार सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सतेज पाटील
आमदार सतेज पाटील

आमदार सतेज पाटील

sakal_logo
By

54854
..........
भारत जोडो यात्रेत ताकदीने उतरणार
आमदार सतेज पाटील : उद्या दसरा चौकात मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातूनही यासाठी दहा हजारांवर कार्यकर्ते सहभागी घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. ८) कोल्हापूरमध्ये दसरा चौक येथे सायंकाळी ६ वाजता भव्य मेळावा घेतला जाणार आहे. मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे मार्गदर्शन करतील. यासाठी सर्वच पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी ताकदीने कामाला लागले असल्याची माहिती काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज दिली. मेळाव्यानिमित्त दसरा चौक येथे सुरू असलेल्या मंडप बांधणी, तसेच इतर कामांची पाहणी केली. तसेच चित्रदुर्ग मठात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, ‘राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्‍मीर अशी भारत जोडो यात्रा करत आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर कोल्हापूरमधील दहा हजार कार्यकर्ते यामध्ये सहभाग घेतील. दरम्यान, त्याची तयारी म्हणून हा मेळावा घेतला आहे. मेळाव्यादिवशी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून दसरा चौक येथे मेळावा घेतला जाईल. ‘नफरत छोडो, भारत जोडो’ ही राहुल गांधी यांची भूमिका घेऊनच हा मेळावा घेतला जाईल.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, सचिन चव्हाण, गुलाबराव घोरपडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, संजय मोहिते, राजू साबळे, तौफिक मुल्लाणी, सुभाष बुचडे, भारती पोवार उपस्थित होते.
...