पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

साडेसोळा लाखांची फसवणूक

वाहनांची परस्पर विक्री; स्टॉक किपरवर गुन्हा

कोल्हापूर ः खोट्या कागदपत्रांआधारे वाहनांची परस्पर विक्री करून १६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात स्टॉक किपरवर गुन्हा नोंद करण्यात आला. वैभव दिनकर पवार (वय २९, रा. शिवाजी पेठ) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश काशीद हे शिवगंगा व्हील या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्या कंपनीत संशयित वैभव पवार हा स्टॉक किपर म्हणून काम करत होता. त्याने २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत कंपनीतील १५ दुचाकींची ग्राहकांना परस्पर विक्री केली. त्यांच्याकडून ऑन रोड रक्कम घेतली. मात्र ती कंपनीत जमा केली नाही. ग्राहकांना वाहन विक्री करताना बनावट बिले, पावत्या, विमा पॉलिसी दिली. कंपनीच्या प्रमाणपत्राचा गैरवापर करत त्या वाहनांची नोंदणीही करून १६ लाख ५० हजारांची फसवणूक केली.
---------
फरशी पायावर पडून दोघे जखमी

कोल्‍हापूर : अणफ (ता. भुदरगड) येथे काम करताना काडाप्‍पा फरशी पायावर पडून दोघे जखमी झाले. लक्ष्‍मण गुंडू कांबळे (वय ४५), कृष्‍णा शंकर कांबळे (४६, दोघे रा. पाळ्याचा हुडा, भुदरगड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना भुदरगड ग्रामीण रुग्‍णालयातून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले.
---------
शिये पुलावरून एकाची उडी

कोल्हापूर ः शिये पुलावरून पंचगंगा नदीत एकाने आज सायंकाळी उडी घेतली. याची माहिती नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध मोहीम राबवली. मात्र अंधार पडेपर्यंत या मोहिमेला यश आले नाही. उद्या (ता. ७) सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली जाणार आहे. संबंधित उडी घेतलेली व्यक्ती कसबा बावडा परिसरातील असल्याचे समजते.
----------