घरफाळा अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा अहवाल
घरफाळा अहवाल

घरफाळा अहवाल

sakal_logo
By

मनपा ..... लोगो
.....

घरफाळा घोटाळा अहवालात त्रुटी

प्रशासकांनी अहवाल उपायुक्तांकडे पाठवला

कोल्हापूर, ता. ६ ः घरफाळा घोटाळ्यातील कागदपत्रांची छाननी करून अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्रुटी काढल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी अहवाल उपायुक्तांकडे परत पाठवला असल्याचे समजते. त्यामुळे पुढील कार्यवाहीला विलंब लागणार आहे.
घोटाळ्याबाबत प्रशासनाने दोन वेगळे अहवाल तयार केले आहेत. यानंतर फौजदारी कारवाई केली आहे. आणखी दोषींवर कारवाई करावी, यासाठी विविध संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे प्रशासकांनी अहवालातील कागदपत्रांची छाननी करून वस्तुस्थिती मांडण्याचे आदेश दिले होते. तत्कालिन कर निर्धारक वर्षा परीट यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर छाननीला गती आली व गेल्या आठवड्यात उपायुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडून अहवाल प्रशासकांसमोर ठेवण्यात आला. दसऱ्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता होती; पण प्रशासकांनी रकमेबाबत त्रुटी काढली असून, ती दुरुस्त करण्यास सांगून अहवाल उपायुक्तांकडे पाठवला असल्याचे समजते. ती दुरुस्त करून पुन्हा प्रशासकांसमोर जाण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीला वेळ लागण्याची शक्यता आहे.