इचल : लम्पीग्रस्तांसाठी माणुसकीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : लम्पीग्रस्तांसाठी माणुसकीचा हात
इचल : लम्पीग्रस्तांसाठी माणुसकीचा हात

इचल : लम्पीग्रस्तांसाठी माणुसकीचा हात

sakal_logo
By

54973
-------------
लम्पीग्रस्त जनावरांसाठी ‘माणुसकी’चा हात

इचलकरंजी, ता. ९ : शहरात ‘लम्पी’ने थैमान घातले होते. गोवंशातील जनावरांना या विषाणूचे संक्रमण होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. बोलता न येणाऱ्‍या मुक्या जनावरांच्या मदतीला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक संस्था, गोपालक, विविध सेवाभावी संघटना मदतीला धावल्या. त्यामधून अनेक जनावरांना रोगमुक्त होण्यास मदत केली. मात्र शहरातील भटक्या जनावरांवर उपचार करताना मर्यादा येत होत्या. त्यासाठी माणुसकी फाउंडेशनने राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे छावणी उभारून ‘लम्पी’ग्रस्त जनावरांवर मोफत औषधोपचार सुरू ठेवले.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात ‘लम्पी’च्या आजाराची अनेक जनावरांना लागण झाली आहे. प्रशासन, तसेच विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने अशा जनावरांसाठी लस आणि औषधोपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेली माणुसकी फाउंडेशनसुद्धा या मुक्या जनावरांसाठी धावली आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या भटक्या जनावरांनाही ‘लम्पी’ची लागण झाली असून तोंडाला फेस येऊन रस्त्यावर पडणे, तापामुळे रस्त्यावर सुन्न होऊन पडणे असे प्रकार घडत होते. अशा जनावरांची केविलवाणी अवस्था पाहून माणुसकी फाउंडेशनने शक्य ती मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील ‘लम्पी’ग्रस्त जनावरांना राजीव गांधी सांस्कृतिक भवन प्रांगणात २४ तास मोफत औषधोपचार सुरू आहेत. यामध्ये लक्ष्मी-विष्णू गोशाळा, शिवराणा बहुउद्देशीय संस्था, ॲनिमल केअर अशा काही संस्थांच्या माध्यमातून औषधोपचार सुरू आहेत. ही सेवा जनावरे ‘लम्पी’मुक्त होईपर्यंत माणुसकी फाउंडेशन अखंडितपणे चालू ठेवणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष रवी जावळे यांनी सांगितले.
-----------
आयुर्वेदिक पौष्टिक लाडू
‘लम्पी’संसर्गित जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढून ‘लम्पी’पासून मुक्त व्हावीत, यासाठी शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पौष्टिक लाडू व होमिओपॅथिक औषधांचा पुरवठा केला जात आहे. ही औषधे मोफत असल्याने याचा लाभ गोपालकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.