पाणी पुरवठा अधिकारी तालुक्याचा दौर्‍यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा अधिकारी तालुक्याचा दौर्‍यावर
पाणी पुरवठा अधिकारी तालुक्याचा दौर्‍यावर

पाणी पुरवठा अधिकारी तालुक्याचा दौर्‍यावर

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...
.....

पाणीपुरवठा अधिकारी तालुका दौऱ्या‍वर

‘जलजीवन मिशन’च्या पाठपुराव्यासाठी सुटी दिवशीही कार्यालय सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ८ : जिल्‍हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जल जीवन मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी व सर्व प्रकल्‍प अहवाल पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर अखेरची मुदत देण्यात आली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सुटी न घेता काम करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (ता. ८) सुटीच्या दिवशीही जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय सुरू होते. तर कार्यकारी अभियंत्यांपासून सर्व उपअभियंते व शाखा अभियंते हे तालुक्यांच्या दौऱ्या‍वर गेल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. याचबरोबर गावोगावी पाणी योजनांची माहिती व्‍हावी, योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी डिजिटल फलक लावण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

जलजीवन मिशन हा प्रकल्प केंद्र शासनाच्या महत्त्‍‍वकांक्षी प्रकल्‍पांच्या यादीत आहे. त्यामुळे दर आठवड्याला पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्‍वाल सातत्याने आढावा घेत आहेत. कोणता जिल्‍हा या कामात मागे असेल तेथील अधिकाऱ्यांची झाडाझडती होत आहे. आपला जिल्‍हा मागे राहू नये, यासाठी सर्वच अधिकारी प्रयत्‍नशील आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोल्‍हापूर जिल्‍ह्याची अवस्‍था बिकट होती. त्यामुळे सातत्याने हा जिल्‍हा टार्गेट होत होता. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांनी तालुकानिहाय दौरे करून कामांचा आढावा घेतला. काम करणाऱ्यांना शा‍बासकीची थाप तर काम न करणाऱ्यांचा शेलक्या शब्‍दात समाचार घेत, पुन्‍हा एकदा जिल्‍ह्याला या योजनेत चांगल्या स्‍थितीत आणण्याचे काम केले.

अजूनही जिल्‍ह्यातील ५०० योजनांचे आराखडे होणे बाकी आहे. यासाठी २५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या योजनांचे सर्वेक्षण करणे, आराखडे तयार करणे, योजनांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया पार पाडण्याचे महत्त्‍वा‍चे काम ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत केले जाणार आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या तालुका व जिल्‍हा स्‍तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.
....
कोट

‘जलजीवन मिशन योजना ठरलेल्या वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनातून सतत आढावा सुरू आहे. राज्यात जिल्‍ह्याचा क्रमांक प्रथम यावा यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. ऑक्‍टोबरअखेर सर्व योजनांची कामे मार्गी लावली जाण्यासाठी नियोजन केले आहे. महत्त्‍वाचे म्‍हणजे योजनेची माहिती ग्रामस्‍थांना असावी व योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी गावोगावी डिजिटल फलक लावले जात आहेत.
संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी