आम आदमी निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम आदमी निदर्शने
आम आदमी निदर्शने

आम आदमी निदर्शने

sakal_logo
By

फोटो

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात
आदमी पक्षातर्फे निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘माफी मागा, माफी मागा, चंद्रकांत पाटील माफी मागा,’ अशी घोषणा देत आम आदमी पक्षातर्फे (आम) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे येथील सभेत मंत्री पाटील यांनी ‘एकवेळ आई-वडिलांना शिव्या द्या. आईवरून शिव्या देणे ही कोल्हापूरची पद्धत आहे. पण, मोदी-शहांवर बोलणं खपवून घेणार नाही,’ असे वक्तव्य केले. आई-वडिलांचा व कोल्हापूरचा अपमान करणारे हे वक्तव्य आहे. या पद्धतीने कोल्हापूरला हिणवण्याचे काम पाटील यांच्याकडून वारंवार केले जात आहे. कोल्हापूरची भाषा रांगडी आहे. आई-वडिलांचा व महिलांचा आदर करण्याचे संस्कार कोल्हापूरकरांवर आहेत. पाटील यांनी बेताल वक्तव्ये करणे थांबवले नाही, तर त्यांना कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अभिजित कांबळे, विलास पंदारे, सी. व्ही. पाटील, राज कोरगावकर, शशांक लोखंडे, किशोर खाडे उपस्थित होते.