इचल : आमदार आवाडे प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : आमदार आवाडे प्रेस
इचल : आमदार आवाडे प्रेस

इचल : आमदार आवाडे प्रेस

sakal_logo
By

इचलकरंजीचा पहिला महापौर भाजपचाच
---
प्रकाश आवाडे यांचा दावा; निवडणूकही ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास तयार
इचलकरंजी, ता. ८ ः विधानसभा निवडणुकीत मी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मी भाजपचेच काम करीत आहे. आगामी इचलकरंजी महापालिका निवडणूकही आम्ही भाजप चिन्हावर लढण्यास तयार आहोत. इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपचाच होईल, असा दावा आमदार प्रकाश आवाडे यांनी केला.
येथील ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जवाहर सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा हा पावसाळी वातावरण कमी झाल्यावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी एकत्रित चर्चा केली. त्यानंतर मंत्री शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
आमदार आवाडे म्हणाले, की मी आमदार म्हणून निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशीत मुंबईत जाऊन भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कोणतीही अट घातलेली नव्हती. त्यांचे सरकार येणार की नाही, हे माहीतही नव्हते. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांचे सरकार आले नाही. पण, मी माझा पाठिंबा बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून मी भाजपच्या पाठिंब्यावर ठाम आहे. आजही भाजपचेच काम करीत आहे. यापुढेही पक्षाकडून दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहे.
---
फुटकळ टिकेवर बोलणार नाही
फुटकळ टिकेवर मी बोलणार नाही. माझे काम बोलते, टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत आमदार आवाडे यांनी माजी नगरसेवक सागर चाळके यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. शासनाकडून मक्तेदारांची देणी भागविण्यासाठी मी जबाबदारी घेतली होती. त्यासाठी आवश्यक माहिती मला दिली नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
----
सुळकूड योजना होणारच
इचलकरंजीसाठी सुळकूडची दूधगंगा योजना मंजूर झाली. त्याला नदीकाठावरील गावांतून विरोध होत आहे. याप्रश्नी सर्वांना विश्वासात घेऊन ही योजना मार्गी लावली जाईल, असे आवाडे यांनी या वेळी सांगितले. याबाबत जवाहर कारखान्यावर एक व्यापक बैठकही घेतली होती. पण, या योजनेला वेळ होईल, तसे पुढारीही वाढत चालले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.
----
पंचगंगा प्रदूषणमुक्तीबाबत पाठपुरावा
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याबाबत आपली ठाम भूमिका आहे. उद्योगातून होणारे प्रदूषण थांबले पाहिजे. मोठ्या गावाच्या ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी झाली पाहिजे. गंगा नदी शुद्धीकरणाच्या धर्तीवर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. याप्रश्नी सरकारही गंभीर आहे, असे आवाडे यांनी या वेळी सांगितले.