जलजीवन मिशन -खासदार माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलजीवन मिशन -खासदार माने
जलजीवन मिशन -खासदार माने

जलजीवन मिशन -खासदार माने

sakal_logo
By

नळ पाणीपुरवठा योजनांसाठी ४२३ कोटी मंजूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ : खासदार माने यांची माहिती

कोल्हापूर, ता. ९ : केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकूण ४११ गावांमधील नळ पाणीपुरवठा योजनांसाठी ४२३.८६ कोटी रुपये मंजूर झाल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला जल जीवन मिशन कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘हर घर नल से जल’ या घोषवाक्यानुसार या प्रकल्पांतर्गत २०२४ पर्यंत प्रती व्यक्ती प्रती दिन ५५ लिटरप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन राबवत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही जल जीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून जलजीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार २६४ योजनांचा १०६४.४० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागणीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण ४९१ योजनांचा ४२३.८६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्यास अनुसरून एकूण ३८८ योजनांची अंदाजपत्रके तयार करणेत आलेली असून २८४ योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच, २०७ योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून उर्वरित योजनांच्या निविदा प्रसिद्ध करणेची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील १३०, शाहूवाडी तालुक्यातील १४७, हातकणंगले तालुक्यातील ६८ व शिरोळ तालुक्यातील ६६ गावांमधील एकूण ४९१ योजनांचा समावेश आहे.