संजय निराधार गांधी योजनेतील आठ कोटी ४० लाख मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय निराधार गांधी योजनेतील आठ कोटी ४० लाख मिळणार
संजय निराधार गांधी योजनेतील आठ कोटी ४० लाख मिळणार

संजय निराधार गांधी योजनेतील आठ कोटी ४० लाख मिळणार

sakal_logo
By

संजय निराधार गांधी योजनेतील
आठ कोटी ४० लाख मिळणार
प्रकाश आवाडे; आठवड्यात खात्यावर जमा
इचलकरंजी, ता. ८ : गेल्या दीड ते दोन वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या योजनेतील इचलकरंजीसह परिसरातील सुमारे १० हजार लाभार्थ्यांना आठ कोटी ४० लाखांचे अनुदान राज्य शासनाकडून वितरीत केले आहे. येत्या आठवड्याभरात सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना दिली.
आमदार आवाडे म्हणाले, ‘‘इचलकरंजी शहर व परिसरात सुमारे ३३ हजार लाभार्थी आहेत. यातील सन २०१९ पासून चार बैठकांमध्ये नव्याने मंजूर करण्यात आलेल्या सुमारे १० हजार लाभार्थ्यांना गेली दीड ते दोन वर्षापासून अनुदान मिळाले नव्हते. याबाबत मेळावा घेऊन दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचा शब्द दिला होता.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रलंबित अनुदान वितरीत करण्याची लेखी मागणी केली होती. त्यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रासाठी येत्या मार्च महिन्यापर्यंतचा २४०० कोटी निधी मंजूर केला. हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.’’
या वेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, रमेश पाटील, कोंडिबा दवडते, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, राहुल घाट, संजय केंगार, अरुण आवळे, महावीर कुरुंदवाडे उपस्‍थित होते.
--------------
चौकट
अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील
निराधारांसाठी असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तर लाभार्थ्यांचे पोस्टात खाते काढण्यासाठी दिवाळीनंतर विशेष मोहीम हाती घेणार आहे, अशी माहिती आवाडे यांनी या वेळी दिली.