रेड क्रॉड सोसायटीतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेड क्रॉड सोसायटीतर्फे मदत
रेड क्रॉड सोसायटीतर्फे मदत

रेड क्रॉड सोसायटीतर्फे मदत

sakal_logo
By

भटक्या विमुक्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोल्हापूर, ता. ८ : विजयादशमीनिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजतर्फे कागल एमआयडीसी परिसरामध्ये दोन ठिकाणी वस्ती करून असणारे भटके विमुक्त नवनाथ डवरी समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. एम. बी. शेख, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या श्रीमती सरोज पाटील (माई), राजर्षी छत्रपती शाह कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. डी. कदम तसेच हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडरे कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. आर. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वितरण झाले. यावेळी डॉ. भोसले, डॉ. सिंधू आवळे, कळंबा कारागृह निरीक्षक श्रीमती मीरा बाबर, शाह कॉलेजमधील एस. एन. सीताप, व्ही. जे. शेंडगे, ए. टी. पाटील आदी उपस्थित होते.