कामगार कल्याण भजन स्पर्धेत इचलकरंजी केंद्र प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार कल्याण भजन स्पर्धेत इचलकरंजी केंद्र प्रथम
कामगार कल्याण भजन स्पर्धेत इचलकरंजी केंद्र प्रथम

कामगार कल्याण भजन स्पर्धेत इचलकरंजी केंद्र प्रथम

sakal_logo
By

इचलकरंजी ललित कला भवन
महिला भजन स्पर्धेत प्रथम

कामगार कल्याण विभागः पुरुष गटात भोगावती कारखाना संघ अव्वल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कामगार कल्याण विभागातर्फे पुरुष व महिला कामगारांसाठी घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत महिला गटात इचलकरंजी ललित कला भवन, बिंदू चौक कामगार कल्याण केंद्र, कागल कामगार कल्याण केंद्र यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. पुरुष गटात भोगावती सहकारी साखर कारखाना संघ, कागल एल्काम इंटरनॅशनल प्रा. लि. कामगार संघ, इंडोकाऊन्ट इंडस्‍ट्रीज कागल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. विजेत्यांना आमदार जयश्री जाधव, पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवराज नाईकवडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला. यातील प्रथम क्रमांक विजेत्या संघांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी निवड झाली. विजेत्या संघातील उत्कृष्ट गायक-गायिका, तबला पेटी वादक, ताल संचलन यांनाही रोख रक्कम, तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात आले. वंदना कांबळे, आनंद धर्माधिकारी, प्रदीप कुलकर्णी यांनी परीक्षण केले.
उद्योजक राजसी सप्रे-जाधव, चंद्रशेखर फडणीस, अनंत पाटील यांच्या हस्ते पारितोषक वितरण झाले. केंद्र संचालक सचिन खराडे व संघसेन जगतकर यांनी स्वागत केले. विकास पाटील यांनी आभार मानले. चंद्रकांत घारगे, दिपक गावराखे, सचिन शिंगाडे, रूपेश मोरे, विजय खराडे, अशोक कौलगी, शाहीन चौगुले, शोभा पोरो, सुचित्रा चव्हाण आदींनी संयोजनात सहभाग घेतला, अशी माहिती कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र शिंगाडे यांनी दिली.