सुनिल लवटेंचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनिल लवटेंचा सत्कार
सुनिल लवटेंचा सत्कार

सुनिल लवटेंचा सत्कार

sakal_logo
By

डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा आज नागरी सत्कार
---
डॉ. सदानंद मोरे यांची उपस्थिती; आठ ग्रंथांचे होणार प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा नागरी सत्कार उद्या (ता. ९) होत आहे. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चारला सत्कार होईल. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रसिद्ध लेखक-अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील.
डॉ. लवटे नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. जे. पी. माळी, सचिव विश्वास सुतार व सहकाऱ्यांनी या सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. या वेळी डॉ. लवटे यांच्या कार्याचा आढावा घेणारे आठ ग्रंथ प्रकाशित होतील.
डॉ. सुनील लवटे साहित्य समीक्षा- डॉ. जे. पी. माळी, बहुविध संवाद- विश्वास सुतार, आमाप माणूस- डॉ. अर्जुन चव्हाण, जीवनकार्य- विश्वास सुतार, सरल्या ऋतूचे वास्तव (काव्यसंग्रह), मी या काळात नाही (काव्यसंग्रह), हाताची घडी तोंडावर बोट (निवडक कवितांचा संग्रह, संकलक- प्रा. रफीक सूरज), पुस्तकाविषयी काही संकीर्ण (विशेष ग्रंथ), खाली जमीन वर आकाश ः एक विमर्ष- प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी लिखित-संपादित केलेले हे ग्रंथ आहेत. दरम्यान, केशवराव भोसले नाट्यगृहात डॉ. लवटे यांच्या विविध भावमुद्रांची रेखाचित्रे दळवीज आर्टच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली असून, त्याचे प्रदर्शनही होणार आहे.