गड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड
गड

गड

sakal_logo
By

फोटो : भीमराव चिकबसर्गे
55247
--------------
हलकर्णीत एकाची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे एकाने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. भीमराव भैरू चिकबसर्गे (५२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता ही घटना निदर्शनास आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव हे कुटुंबासह हलकर्णी भीमनगरात राहतात. निपाणी हद्दीत त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला होता. तेव्हापासून ते मानसिक तणावात होते. दरम्यान, घरात कोणी नसताना भीमराव यांनी राहत्या घराच्या सोप्यातील लाकडी तुळीला नायलॉन दोरीने गळफास घेतला. नातेवाईक घरी आल्यानंतर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.