गडहिंग्लज हायस्कूलला शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज हायस्कूलला शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट
गडहिंग्लज हायस्कूलला शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट

गडहिंग्लज हायस्कूलला शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट

sakal_logo
By

55253
--------------------------
गडहिंग्लज हायस्कूलला
शिक्षणाधिकारी आंबोकर यांची भेट
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर व उपशिक्षणाधिकारी भीमराव टोणपे यांनी सदिच्छा भेट दिली. शालेय कामकाज, शालेय परिसराची पाहणी केली. कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनी साक्षी गोरुले हिला वाढदिवसानिमित्त श्री. आंबोकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पंडित पाटील, पर्यवेक्षक सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
------------------------------
शेतकऱ्यांचे उद्या धरणे
गडहिंग्लज : देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकरी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार आहेत. येथील प्रांत कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ११) दुपारी बाराला हे आंदोलन होणार आहे. देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे नोंद करावी, शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास थांबवावा, खंड भरून घेऊन त्यांच्या पावत्या द्याव्यात, मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे दाखल करणे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील देवस्थान, इनामधारक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
--------------------------------
55254
जागृती प्रशालेत वायुसेना दिन
गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत ९० वा भारतीय वायुसेना दिन साजरा केला. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा बजावलेले सार्जंट चंद्रकांत पाटगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य विजय चौगुले अध्यक्षस्थानी होते. आर. बी. मुल्ला यांनी स्वागत केले. एम. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. वायुसेनेत दाखल होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास व मेहनत करावी, असे आवाहन श्री. पाटगावे यांनी केले. फायटर स्कॉडबाबतची माहिती त्यांनी सांगितली. मिग-२९ ची प्रतिकृती तयार करणाऱ्या तनिष्क सुर्वेचे कौतुक केले. व्ही. एस. शेडगे यांनी आभार मानले.
------------------------------
शिंदे विद्यालयात संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयात दिनकरराव शिंदे जयंतीनिमित्त विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण, रांगोळी व कागदकाम प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम झाला. माजी नगरसेवक उदय कदम यांच्या हस्ते रांगोळी व कागदकाम प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण झाले. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी जाहीर केलेल्या देणगीचा एक लाखाचा धनादेश व डॉ. रचना थोरात यांनी जाहीर केलेल्या ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेच्या विकासकामांसाठी मुख्याध्यापक कृष्णा घाटगे यांच्याकडे सुपूर्द केला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. कोरी यांनी केले. माजी उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी, महांतेश पाटील, सुधाकर धनवडे, राणी शिंगे, प्रकाश म्हेत्री, सुवर्णा पोवार, विष्णू कुराडे, भ. ल. कांबळे, मारुती राजमाने, विद्या चव्हाण, आंबूताई धनवडे, नीता निडोणी, सरिता धनवडे, चंद्रशेखर सावरे आदी उपस्थित होते. नम्रता होडगे यांनी आभार मानले.